शासनाच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत परिचारिकांच्या मानधनात १ एप्रिलपासून वाढ, शासननिर्णय जारी
Mar 26 2026
32
शासनाच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत परिचारिकांच्या मानधनात १ एप्रिलपासून वाढ, शासननिर्णय जारी
पिंपरी, ता. २६ - शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन परिचारिकांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ केली जाणार आहे. मानधनातील ही वाढ १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
आरोग्य उपकेंद्रामधील परिचारिकांनी सन २०१९ च्या शासन निर्णयानुसार दरमहा तीन हजार रुपये मानधन अदा करण्यात येत होते. परिचारिकांच्या कामाचे बदलते स्वरुप, आरोग्य सेवेतील वाढती भूमिका आणि वाढत्या महागाईचा विचार करु आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मानधनवाढीसाठी पुढाकार घेतला.
नवीन निर्णयानुसार, आता परिचारिकांना सध्याचे तीन हजार आणि प्रस्तावित वाढ तीन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये मासिक मानधन १ एप्रिल पासून देण्यात येणार आहे.