संत तुकारामनगरमधील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा, वेश्याव्यवसाय उघडकीस, ३ महिलांची सुटका
संत तुकारामनगरमधील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा, वेश्याव्यवसाय उघडकीस, ३ महिलांची सुटका
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाची धडक कारवाई
पिंपरी, ता. २६ - संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सम्राट चौकातील RICH FEEL SPA येथे छापा टाकून वेश्याव्यवसायासाठी वापर करण्यात येणाऱ्या ३ पिडीत महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बुधवारी (ता. २५) ही धडक कारवाई केली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली शेंडगे व पथकाने ही कारवाई केली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली तेथे वेश्याव्यवसाय सुरु होता. या प्रकरणी स्पा-चालक मयुर दिनेश मोहिते (वय २६ वर्षे, रा. दिघी) व स्पा-मॅनेजर अक्षय महादेव सुतार (वय २६ वर्षे, सध्या रा. साईनाथनगर, निगडी) यांच्याविरुध्द संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३ (३), ३(५) सह पिटा कलम ३,४,५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पा-मॅनेजर अक्षय महादेव सुतार यास अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली (प्रादेशिक विभाग), पोलीस उप-आयुक्त डॉ. शिवाजी पवार (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे (गुन्हे-१) यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, महिला सहा पालीस निरीक्षक श्रीमती वैशाली शेंडगे, अंमलदार सपोफौ सुनिल शिरसाट, पोहवा/४९१ भगवंता मुठे, पोहवा/१७६८ गणेश कारोटे, मपोहवा/१००६ श्रध्दा भरगुडे, मपोहवा १३७७ वैष्ण्वी गावडे, मपोहवा /११२९ निलम बुचडे, मपोहवा /१३७८ संगिता जाधव, पोशि/१७९० उदयकुमार भोसले यांच्या पथकाने केली आहे.
वेश्याव्यवसाय करणाऱ्या मसाज पार्लर, स्पा, हॉटेलवरील कारवाईचा आढावा -
सन २०२६ मध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या एकूण ८ आस्थापनांवर छापे टाकून भारतीय न्याय संहिता सह पिटा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. त्यात एकूण ६ मसाज पार्लर / स्पा, २ हॉटेल या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. सदर ८ गुन्हयांमध्ये एकूण २० आरोपींना अटक करण्यात आली असुन १७ पिडीत महिलांची सुटका करण्यात आलेली आहे. सदरची धडक कारवाई भविष्यात देखील अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
तसेच, मागील ३ वर्षांच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी मसाज पार्लर / स्पा, हॉटेल/लॉज व रहिवाशी ठिकाणांआडून अवैधरित्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या एकूण २९ आस्थापना १ वर्षाच्या कालावधीसाठी बंद करण्याबाबत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी प्राथमिक चौकशी अंती आदेश जारी केले आहेत.सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या इतर आस्थापनांची देखील प्राथमिक चौकशी सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले.