news
clock
हिंजवडी आणि पुणे परिसरातील आयटीयन्सचीही 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी

हिंजवडी आणि पुणे परिसरातील आयटीयन्सचीही 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी

 हिंजवडी आणि पुणे परिसरातील आयटीयन्सचीही 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी

पिंपरी, ता. १३ - अमेरिका-इराण युद्धामुळे आपल्या देशात इंधन बचतीसाठी  व देशावरील आयात खर्चाचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्य असेल तिथे 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय अवलंबण्यास सांगितले आहे. त्यानंतर, Nascent Information Technology Employees Senate (NITES) या IT कर्मचाऱ्यांच्या संघटनेने केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून IT आणि ITES क्षेत्रात शक्य त्या ठिकाणी Work From Home लागू करण्याची मागणी केली आहे.  पिंपरी-चिंचवडमधील 'फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज, महाराष्ट्र' आणि 'हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन'ने देखील 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी केली आहे. 

या संघटनांनी म्हटले आहे की, हिंजवडी परिसरात आयटीच्या छोट्या-मोठ्या २७० कंपन्या आहेत, त्यात रोज ४ ते ५ लाख कर्मचारी ये-जा करतात. हिंजवडी आयटी पार्कसह बाणेर, बालेवाडी, तळवडे,  खराडी, विमाननगर, मगरपट्टा, या परिसरातही आयटी पार्क आहेत. त्यामुळे, आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गहन होऊ लागली आहे. त्यामुळे इंधनही वाया जात असून प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या सर्व प्रश्नावर वर्क फ्रॉम होम लागू करणे हा योग्य पर्याय आहे. 

याबाबत,   'फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज, महाराष्ट्र'चे अध्यक्ष पवनजीत माने म्हणाले, ''वाहतूक कोंडी, पावसाळ्यात  रस्त्यांवर तुंबणारे पाणी आणि अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधा या अडचणींमुळे 'आयटीयन्स'कडून 'वर्क-फ्रॉम-होम'ची मागणी होत होती. पण, कंपन्या ते नाकारत होत्या. आता पंतप्रधान मोदी यांनीच आवाहन केल्यानंतर पुन्हा कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होमची मागणी होत आहे. पंतप्रधानांचे आवाहन प्रत्यक्षात उतरले पाहिजे. त्यासाठी राज्य किंवा केंद्र सरकारने कंपन्यांना तशा सूचना देऊन 'वर्क-फ्रॉम होम'चे निर्देश दिले पाहिजेत.''




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories