कर्नाटक, तेलंगणा भागात वादळी पावसाची शक्यता
पुणे, ता. २७ - भारतीय हवामान खात्याच्या 24 hrs model नुसार दक्षिण महाराष्ट्र तसेच लगतच्या उत्तर कर्नाटक आणि तेलंगणा भागात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने सांगतिले आहे की, विदर्भातील काही जिल्ह्यांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने दुपारच्या वेळेत बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी.
हवामानातील बदलामुळे राज्यात पुढील काही दिवस एका बाजूला वादळी पावसाचे वातावरण तसेच दुसऱ्या बाजूला उष्णतेची तीव्रता अशी दुहेरी स्थिती पाहायला मिळू शकते.