news
clock
निगडीतील कन्स्ट्रक्शन साईटवर वादातून मारहाण,  एक जखमी

निगडीतील कन्स्ट्रक्शन साईटवर वादातून मारहाण, एक जखमी

निगडीतील कन्स्ट्रक्शन साईटवर वादातून मारहाण,  एक जखमी

पिंपरी, ता. २७ - निगडी परिसरात कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या वॉचमनवर व त्याच्या कुटुंबीयांवर दगडाने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  बुधवारी (ता. २५) रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास प्राधिकरण चौकीजवळील कन्स्ट्रक्शन साईटवर ही घटना घडली. फिर्यादी अशोक सुभाष मुजमुले (वय २२), हे तेथे वॉचमन म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांच्या घराशेजारी राहणारा आरोपी सागर गोविंद साळवे (वय ३२) हा साईटवर आला.

आरोपीने आपल्या घराचे पत्रे तुटल्याचे सांगत साईटवरील पत्रे देण्याची मागणी केली. मात्र फिर्यादीने नकार दिल्याने आरोपी संतापला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी तसेच त्यांच्या आजोबा व वडिलांना शिवीगाळ केली. पुढे शेजारी पडलेला दगड उचलून फिर्यादी आणि त्यांच्या आजोबा बाळासाहेब रंगनाथ मुजमुले (वय ६०) यांच्या डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात आजोबा जखमी झाले.

या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात भा.न्या.स. कलम ११८(१) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories