आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवारवाडा पटांगणात रविवारी व सोमवारी चित्रप्रदर्शन
Jun 20 2026
13
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवारवाडा पटांगणात रविवारी व सोमवारी चित्रप्रदर्शन
पुणे, ता. २० - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे कार्यालयातर्फे शनिवारवाडा पटांगणात दोन दिवसीय माहिती व चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ होणार आहे. पुणे महापालिका आणि राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या सहकार्याने आयोजित प्रदर्शन रविवारी (ता. २१) आणि सोमवारी (ता. २२) सकाळी नऊ ते सायंकाळी सहा दरम्यान सर्वांसाठी खुले आहे.
‘निरोगी वार्धक्यासाठी योग’ संकल्पनेवर आधारित प्रदर्शनात योगासनांची विविध माहिती चित्रांच्या माध्यमातून मांडली जाणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी सकाळी नऊ वाजता होणार असून, या वेळी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे शिक्षक योगासनांची प्रात्यक्षिके सादर करतील. यात नागरिकांनाही सहभागी होता येईल, अशी माहिती ब्युरोचे उपसंचालक डॉ. जे. व्ही. पानपाटील यांनी दिली.
या उपक्रमात केंद्रीय संचार ब्यूरोचे कलाकार योग गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींसह केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.