नवीन क्षेत्रिय कार्यालयांचे कामकाज सुरळित पार पाडण्यासाठी महापालिकेच्या २७२ कर्मचारी-अधिकाऱ्यांची बदली

नवीन क्षेत्रिय कार्यालयांचे कामकाज सुरळित पार पाडण्यासाठी महापालिकेच्या २७२ कर्मचारी-अधिकाऱ्यांची बदली

 नवीन क्षेत्रिय कार्यालयांचे कामकाज सुरळित पार पाडण्यासाठी महापालिकेच्या २७२ कर्मचारी-अधिकाऱ्यांची बदली 

१०३ लिपीक, ५८ मुख्य लिपीक, ७५  कनिष्ठ अभियंता व ३६ उपअभियांत्यांचा समावेश 

पिंपरी, ता. २० - पिंपरी-चिंचवड महापालिकेची १० क्षेत्रिय कार्यालये १ जुलैपासून पुनर्रचनेनंतर नव्याने सुरु होत आहेत. या ठिकाणी नागरीकांना चोख सेवा देण्यासाठी महापालिका प्रशासाने लिपीक, मुख्य लिपीक आणि कनिष्ठ अभियंता अशा एकूण २३६ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबतचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले आहेत.  

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान ८ क्षेत्रिय कार्यालयांची पुनर्रचना करुन एकूण १० क्षेत्रिय कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. या क्षेत्रिय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज १ जुलै २०२६ पासून सुरु होणार आहे. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या क्षेत्रिय कार्यालयांमधील दैनंदिन प्रशासकीय कामकाज प्रभावी, कार्यक्षम, सुसूत्र व समन्वयपूर्ण पद्धतीने पार पाडण्यासाठी तसेच प्रशासकीय आवश्यकतेनुसार १०३ लिपीक, ५८ मुख्य लिपीक आणि ७५ कनिष्ठ अभियंते, ३६ उपअभियंत्यांची बदली करण्यात आली आहे. 

बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले असून बदलीच्या ठिकाणी २२ जूनपर्यंत रुजू व्हावे.  रुजू अहवालाची एक प्रत सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्याची दक्षता घ्यावी. बदली झालेल्या कर्मचा-यांनी आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत, लेखी स्वरुपात कार्यभार हस्तांतरण करावे व तसा अहवाल संबंधित विभागप्रमुखांना द्यावा, अन्यथा सदर अधिकारी हे प्रशासकीय कारवाईस पात्र राहतील याची त्यांनी नोंद घ्यावी. बदलीच्या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ व कार्यक्षमरित्या होण्याकरीता संबंधित महानगरपालिका विभागांनी खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे डॉ. सूर्यवंशी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories