'आयपीएल'च्या १९ व्या पर्वाला २८ मार्चपासून सुरुवात, दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर
पुणे, ता. २६ - इंडियन प्रीमिअर लीगच्या १९ व्या पर्वाला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. प्रांरभी गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होईल. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमियर लीग - २०२६ च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पूर्वी २८ मार्च ते १२ एप्रिल पर्यंतच्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. लीग टप्प्यातील पुढील ५० सामने १३ एप्रिल ते २४ मे २०२६ या कालावधीत भारतातील १२ ठिकाणी खेळले जातील. दुसऱ्या टप्प्यातील सामने बंगळूर, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ, जयपूर, धर्मशाला, रायपूर आणि नवीन चंदीगड येथे आयोजित केले जातील.
प्लेऑफमधील स्थानासाठी संघ विविध ठिकाणी स्पर्धा करतील. १३ एप्रिल २०२६ रोजी हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याने स्पर्धेला पुन्हा सुरुवात होईल.