काळेवाडी | १३ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला रस्त्यात अडवून मारहाण करत कोयत्याने जखमी केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी मुलाला जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास काळेवाडी येथील पाचपीर चौकाजवळ घडली.
या प्रकरणी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे.
या गुन्ह्यात वैभव देवीदास गणगोपाळ (वय १९ वर्षे, काळेवाडी, पुणे) आणि गौरव चंद्रकांत साळवे (वय १९ वर्षे, काळेवाडी, पुणे) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, तो घटनेच्या वेळी पायी जात होता. त्यावेळी आरोपी क्रमांक एक वैभव गणगोपाळ याने त्याला शिवीगाळ करत अडवले. त्यानंतर फिर्यादीचा डावा हात पकडून हाताने मारहाण केली.
या मारहाणीमुळे फिर्यादीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी क्रमांक एक याने त्याला दोन्ही हातांनी पकडून ठेवले. त्याचवेळी आरोपी क्रमांक दोन गौरव साळवे याने कमरेला लावलेला लोखंडी कोयता काढून फिर्यादीच्या डाव्या हातावर वार केला. या हल्ल्यात अल्पवयीन मुलाच्या हाताला दुखापत झाली.
हल्ल्यानंतर फिर्यादीच्या हातातील कोयता हवेतील दिशेने फिरवत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच "कोणीही मध्ये येणार नाही, कोणी मध्ये आल्यास त्याला सोडणार नाही," असे म्हणत आरोपींनी धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर अल्पवयीन मुलाने काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ आणि २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टच्या कलम ३ व ७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी क्रमांक एक वैभव देवीदास गणगोपाळ याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नलावडे करीत आहेत.