केतन अग्रवाल हत्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून  उज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य

पुणे, ता. २६ - लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल याच्या हत्येच्या प्रकरणात केतनचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज शुक्रवारी (ता. २६) पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.

या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले.

या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories