संविधानाचा आदर आणि रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य - शुभम खेडेकर
आणीबाणीच्या ५१ व्या वर्षांनिमित्त दिघी येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान
पिंपरी, ता. २५ -"२५ जून १९७५ रोजी कोणताही सबळ कारण नसताना केवळ सत्तेसाठी आणि राजकीय फायद्याकरिता घटनेतील कलम ३५२ चा गैरवापर तत्कालीन सरकारने केला. तब्बल २१ महिने चाललेल्या या आणीबाणीत विरोधकांचा आवाज दाबला गेला आणि ‘मिसा’ कायद्याचा वापर करून जनतेवर अन्याय करण्यात आला. ही केवळ आणीबाणी नव्हती, तर ती संविधानाची हत्या होती. त्यामुळे आपण संविधानाचा आदर करणे आणि त्याचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य मानले पाहिजे." असे मत प्रसिद्ध शिवव्याख्याते शुभम खेडेकर त्यांनी व्यक्त केले.
२५ जून १९७५ रोजी देशावर आणीबाणी लादण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेला आता ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त दिघी येथील रामचंद्र गायकवाड विद्यालय ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आणीबाणीचे ५१ वे वर्ष’ आणि ‘संविधान हत्या दिन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
राघव मंगल कार्यालय, दिघी येथे हे व्याख्यान झाले.
या कार्यक्रमास हजारो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आणीबाणीच्या वास्तवाविषयी माहिती जाणून घेतली आणि काही प्रश्नही विचारले.
कार्यक्रमास आणीबाणी चे ५१ वे वर्ष या कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक ॲड. मोरेश्वर शेडगे, जिल्हा सरचिटणीस विकास डोळस, या कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक उदय गायकवाड, माजी उपमहापौर हिराबाई घुले, जिल्हा सहसंयोजक दिनेश यादव, उपाध्यक्ष संजय पटणी, कैलास सानप, रामचंद्र गायकवाड विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक विनोद वाळके सर, नगरसेवक कृष्णाजी सुरकुले, जिल्हा उपाध्यक्ष संतोष तापकीर, मंडल अध्यक्ष प्रमोद परदेशी, अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष रमेश विरणक, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष सुशांत पवार, ह्षिकेश भालेकर, अमित महाडिक, प्रमोद पठारे, दादासाहेब चितळे सर आणि अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद परदेशी यांनी केले, सूत्रसंचालन दादासाहेब चितळे यांनी केले. नगरसेवक उदय गायकवाड यांनी आभार मानले.