'लाडकी बहीण' योजनेचा हफ्ता रखडला, मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत नेमकी माहिती मिळण्याची आशा
'लाडकी बहीण' योजनेचा हफ्ता रखडला, मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत नेमकी माहिती मिळण्याची आशा
पुणे, ता. ४ - 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारीनंतर हफ्ता अद्यापपर्यंत मिळालेला नाही. मे महिन्याची ४ तारीखही उलटूनही पुढील हप्त्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांचे हप्ते कधी मिळणार, याची महिला वाट पाहात आहेत. याबाबत, महिलांना उद्या मंगळवारी नेमकी माहिती मिळण्याची शक्यता आहे. कारण, मंगळवारी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत हप्त्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जातात. पण, सध्या हफ्ते मिळण्यास विलंब होत आहे. मे महिन्याची ४ तारीखही उलटूनही पुढील हप्त्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मार्च आणि एप्रिल असे दोन हप्ते एकत्र मिळणार का, की फक्त एकाच महिन्याचा हप्ता जमा होणार, याबाबत महिलांमध्ये गोंधळ आहे. अनेक महिलांच्या खात्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचेही हप्ते अद्याप जमा झाले नसल्याचीही तक्रार आहे. लाडकी बहिण योजनेद्वारे मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून असंख्य महिलांना त्यांच्या कुटुंबांना सावरण्यासाठी हातभार लागत आहे. त्यामुळे, महिला दर महिन्याला लाभार्थी महिला हफ्त्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात.
मंगळवारी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत हप्त्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे लवकरच प्रलंबित हफ्त्त्याबाबत नेमकी माहिती मिळेल अशी आशा आहे.