news
clock
संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील लांब उडीच्या मैदानाची तातडीने दुरुस्ती करावी, साई स्पोर्ट्स अकॅडमीची मागणी

पिंपरी, ता. २७ - इंद्रायणीनगर-भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील लांब उडीच्या मैदानाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत अकॅडमीचे प्रमुख चंद्रशेखर कुदळे यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी महापौर रवी लांडगे यांना निवेदन दिले व चर्चा केली.

निवेदनात म्हटले आहे की, लांब उडीच्या मैदानातील वाळू अत्यंत कमी झाल्यामुळे खेळाडूंना दुखापतीचा धोका वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण वाळू बदलून दोन्ही लांब उडीचे पटांगण योग्य स्थितीत आणावे. मैदानाच्या मध्यभागी रोलर फिरवून ते सपाट करावे.

महापौरांनी या लांब उडीच्या मैदानाची तातडीने दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले व खेळाडूंचे कौतुक केले.

निवेदन देताना राष्ट्रीय व राज्य स्तरावरील खेळाडू मधुरा खांबे, प्राची अंधारे, नंदिनी कासकर, आर्यन उपाळे, प्रणव माने, हर्षल कुमार, सुरज बांगर, सिद्धेश वर्मा, सौरभ बोरसे उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories