पोटच्या मुलांकडूनच वडिलांना मारहाण ; तीन मुलांवर गुन्हा दाखल

पोटच्या मुलांकडूनच वडिलांना मारहाण ; तीन मुलांवर गुन्हा दाखल

म्हाळुंगे | २६ नोव्हेंबर २०२६ : खेड तालुक्यातील म्हाळुंगे परिसरात एका जेष्ठ नागरिकाला आपल्याच मुलांनी मारहाण करून घर खाली करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३०च्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश साहेबराव शिवळे (वय ७५, रा. म्हाळुंगे) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्याच्या तीन मुलांनी घरात घुसून शिवळे यांना धक्काबुक्की आणि मारहाण केली. केली. तक्रीरत नमूद करण्यात आल्यानुसार,  एकाने बुटाने मारहाण करून घर रिकामे करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच देखभालीची जबाबदारी असतानाही मुलांनी आपली काळजी घेणे बंद केल्याचेही सुरेश शिवळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

त्यांनी आपली तीन मुले प्रमोद सुरेश शिवळे (वय ४०), विशाल सुरेश शिवळे (वय ३८) आणि सचिन सुरेश शिवळे (वय ३५, तिघेही रा. म्हाळुंगे) यांच्याविरुद्ध उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) आणि ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलम २४ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार होळकर करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories