पिंपरी-चिंचवडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवशी दोन घरांवर डल्ला

पिंपरी-चिंचवडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवशी दोन घरांवर डल्ला

पिंपरी-चिंचवड : शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. काळेवाडीत परिसरात एका अज्ञात चोरट्याने एका घरात घुसून हजारो रुपयांची मालमत्ता चोरीला नेली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे भोसरी परिसरातही घरातून आयफोन चोरीला गेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबरच्या सकाळी ८ च्या सुमारास काळेवाडीतील विजनगरच्या मुख्य रस्त्यालगत ही घटना घडली. एका महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. सकाळ 8च्या सुमारास घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने घरात शिरून ६७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

या प्रकरणी काळेवाडी पोलिसांत २५ नोव्हेंबरला अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक नलावडे तपास करत आहेत. 

तर, दुसरीकडे, भोसरीत २४ नोव्हेंबरला सकाळी दहाच्या सुमारास खंडोबा परिसरातील गजानन हाऊसिंग सोसायटीतील एका घरातून २५ हजार रुपये किमतीचा नारिंगी रंगाचा आयफोन १७ प्रो चोरीला गेला आहे. विजय चौधरी (वय २६) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार ढेकणे तपास करत आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories