'माझ्याकडे काय बघतोस?' म्हणत तरुणाला मारहाण; पिंपरीत दोघांवर गुन्हा दाखल

'माझ्याकडे काय बघतोस?' म्हणत तरुणाला मारहाण; पिंपरीत दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी | २६ नोव्हेंबर २०२६ : पिंपरीत मित्रासोबत दुचाकीवरून फिरायला निघालेल्या एका व्यक्तीला रस्त्यात मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोनजणांविरोदात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित सुनील बहोत (वय ३२, रा. कैलासनगर) याने ही तक्रार दिली आहे. सुमितने दिलेल्या तक्रारीनुसार, २४ नोव्हेंबरला रात्री ९.३०च्या सुमारास आयप्पा मंदिराजवळ ही घटना घडली. सुमित आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून फिरायला निघाला होता. दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने  ‘तू माझ्याकडे काय बघतोस?’ असे विचारून शिवीगाळ केली.


त्यानंतर हातातील लोखंडी कड्याने सुमितला मारले. यामुळे सुमितच्या डोक्याला दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी रोहित सुरेश बोत आणि अजय बोत (दोघे रा. शास्त्रीनगर) यांच्याविरुद्ध पिंपरी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार पवार पुढील तपास करत आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories