ताथवडेत भररस्त्यात अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी!

ताथवडेत भररस्त्यात अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी!

पिंपरी-चिंचवड : ताथवडे परिसरातील अशोकनगर ते ताथवडे चौकात अपघाताची घटना घडली आहे. एका दुचाकीस्वाराला कारची जोरदार धडक बसली असून या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.५० च्या सुमारास अशोकनगरहून ताथवडे चौक रस्त्यावरील पल्स हॉस्पटलसमोर हा अपघात झाला. गौतम राजेंद्र हेद्दुर (वय ३१, रा. ताथवडे) यांना कारची धडक बसली. 

तक्रारीनुसार, हेद्दुर अशोकनगरहून ताथवडे चौकाकडे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी एक कार अचानक उजवीकडे वळळी. यामुळे कारची दुचाकीला धडक बसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. धडकेनंतर हेद्दुर दुचाकीसह रस्त्यावर पडले. त्यांच्या डाव्या हाताच्या अनामिकेला फ्रॅक्चर झाले.

या प्रकरणी वाकड पोलिसांत अज्ञात  कारचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, ११९/१७७ आणि भादवि कलम २७९, ३३८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सिरसाठ पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories