महाराष्ट्रासाठी मार्च-एप्रिलसाठील ३७ लाख ४४ हजार लिटर रॉकेलचा कोटा मंजूर
रेशन दुकाने व पेट्रोल पंपावर प्रत्येक कार्डाला मिळणार ३ लिटर रॉकेल
पुणे, ता. २७ - आखाती देशातील युद्धामुळे देशभरात इंधन टंचाईची समस्या उभी राहिली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मार्च-एप्रिल या महिन्यामध्ये ३७ लाख ४४ हजार लिटर रॉकेलचा कोटा मंजूर केला आहे. प्रत्येक रेशनकार्डला ३ लिटर रॉकेल मिळणार आहे.
ज्या नागरीकांकडे घरगुती गॅसचे कनेक्शन नाही त्यांना तसेच पीएचएच रेशनकार्ड आणि अंत्योदय रेशनकार्ड धारकांना प्राधान्याने रॉकेल मिळेल. स्वस्त धान्य दुकानांमध्ये आणि शहरी भागांमध्ये पेट्रोल पंपांवरही हे रॉकेल मिळणार आहे.
ज्या नागरीकांना रॉकेल हवे आहे त्यांनी आपले रेशनकार्ड ऑनलाईन पद्धतीने अपडेट करायचे आहे. mahafood.gov.in या वेबसाईटवर ही सुविधा आहे. वेबसाईटवरील ऑनलाईन सर्व्हिस या ऑप्शनमध्ये जाऊन एडिट रेशनकार्ड या पर्यायावर क्लिक करायचे. उमंग अपवरुनही रेशनकार्ड अपडेट करता येईल.