राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्रातील योगपटूंची भरीव कामगिरी, सुवर्ण पदकासह १५ पदकांना गवसणी
Mar 27 2026
33
राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्रातील योगपटूंची भरीव कामगिरी, सुवर्ण पदकासह १५ पदकांना गवसणी
पुणे, ता. २७ - अखिल भारतीय नागरी सेवा योगासन स्पर्धेत महाराष्ट्रातील योगपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल 15 पदकांना गवसणी घातली आहे. चंदीगड येथे नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या.
केंद्रीय नागरी सेवा क्रीडा विभागाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. चंदीगडकडे यजमानपद होते. या स्पर्धेत २४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून सुमारे ४०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या योगपटूंनी १ सुवर्ण, ७ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण १५ पदके जिंकली. योग विभाग सचिवालयाच्या मानद सचिव अपर्णा जाधव यांनी महाराष्ट्राच्या योगपटूंना मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय नागरी सेवा योग स्पर्धा - २०२५-२६ - पदकविजेते -
- सुवर्ण पदक : दत्ताराम सावंत आर्टिस्टिक सोलो परफॉर्मन्स (५०+ वयोगट)
- रौप्य पदक : योगेश्वर सानप व अभिजीत गायकवाड आर्टिस्टिक पेअर (४० वर्षाखालील वयोगट)
- शुभांगी सेजुळ व योगिता देसाई आर्टिस्टिक पेअर (५०+ वयोगट)
- दत्ताराम सावंत व नामदेव चौधरी आर्टिस्टिक पेअर (५०+ वयोगट)
- कांस्य पदक : श्रीकांत घोलकर व अभिजीत गायकवाड रिदमिक पेअर (४० वर्षाखालील वयोगट)
- दयानंद बिडवे - ट्रॅडिशनल सोलो व आर्टिस्टिक सोलो (४०-५० वयोगट), योगिता देसाई आर्टिस्टिक सोलो - (५०+ वयोगट) संगीता शेळके व भारती खराडे रिदमिक पेअर (५०+ वयोगट) (एकूण ७ कांस्य).
- महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सांघिक गटात उपविजेतेपद (द्वितीय पारितोषिक) पटकावले.