स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या पहिल्या सेगमेंट कास्टिंग कामाचा प्रारंभ

स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या पहिल्या सेगमेंट कास्टिंग कामाचा प्रारंभ

स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या पहिल्या सेगमेंट कास्टिंग कामाचा प्रारंभ 

पिंपरी, ता. १३ - मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज मार्गिकेच्या पहिल्या सेगमेंट कास्टिंगच्या कामाचा मंगळवारी (ता. १२) शुभारंभ झाला. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते नारळ वाढवून यंत्रसामग्रीचे पूजन करण्यात आले. 

याप्रसंगी महामेट्रोचे संचालक श्री. विनोदकुमार अग्रवाल (प्रणाली व संचालन), हरेंद्र पांडे, संचालक (वित्त) तसेच महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ (कार्य) यांच्यासह पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच CEM India चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी इथे सुरु असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामाची माहिती जाणून घेत आवश्यक सूचना दिल्या.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories