news
clock
'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण

'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण

'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण

पुणे, ता. १३ - 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. 

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह संत-महंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२०२८ दरम्यान गोदावरी नदीच्या काठावर आयोजित केला जात आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजावतरणाने (रामकुंड व त्र्यंबकेश्वर) याचा प्रारंभ होणार आहे. २४ जुलै २०२८ पर्यंत चालणाऱ्या या १२ वर्षांतून एकदा येणाऱ्या पवित्र सोहळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने (NTKMA) नियोजन सुरु केले आहे. 

थोडक्यात - सिंहस्थ कुंभमेळा 2026–2028 

- प्रारंभ: 31 ऑक्टोबर 2026 (रामकुंड, पंचवटी)

- समाप्ती: 24 जुलै 2028

- कालावधी -  तब्बल 22 महिन्यांचा दुर्मिळ “त्र्यंबी सिंहस्थ”

- मुख्य शाही स्नान - 2027

• 2 ऑगस्ट 2027 - अमृत स्नान

• 31 ऑगस्ट 2027 - अमृत स्नान

• 11 सप्टेंबर 2027 (नाशिक) - अमृत स्नान

• 12 सप्टेंबर 2027 (त्र्यंबकेश्वर) - अमृत स्नान



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories