news
clock
शहरातील नालेसफाईचे काम हाती घेण्याच्या क्षेत्रीय कार्यालयांना सूचना, ३० एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

शहरातील नालेसफाईचे काम हाती घेण्याच्या क्षेत्रीय कार्यालयांना सूचना, ३० एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

शहरातील नालेसफाईचे काम हाती घेण्याच्या क्षेत्रीय कार्यालयांना सूचना, ३० एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट 

पिंपरी, ता. २७ - पावसाळ्यापूर्वीच शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी यंदा महापालिका प्रशासनाने नाले सफाईला सुरुवात करण्याच्या सूचना स्थापत्य विभागाला व क्षेत्रीय कार्यालयांना केल्या आहेत. ३० एप्रिलपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

शहरामध्ये दोन ते ११ मीटर रुंदीचे १०० किलोमीटर अंतराचे १४३ नैसर्गिक नाले आहेत. दरवर्षी नाले सफाई केली जाते. मात्र, हे सर्व नाले उघडे असल्याने नाल्यांमध्ये कचरा, राडारोडा फेकला जातो. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबते. ही परिस्थिती टाळण्यासाठी दरवर्षी आरोग्य विभागाकडून सर्व नाले, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या, चेंबर्स यांची स्वच्छता केली जाते. 

यंदा महापालिका प्रशासाने स्थापत्य विभाग व क्षेत्रीय कार्यालयांना नालेसफाईबाबत सूचना दिल्या आहेत. 

३० एप्रिलपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दर आठवड्याला नालेसफाईचे किती टक्के काम झाले याची माहिती गुगल स्प्रेडशिटमध्ये भरुन ती प्रशासनाला सादर करण्याचीही सूचना देण्यात आली आहे. 

३० एप्रिलपर्यंत नालेसफाईचे उद्दिष्ट

शहरात ३० एप्रिलपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशीनने सफाई केली जाईल. अरुंद नाल्यांमध्ये मशीन जात नाही, तिथे सुरक्षेची सर्व साधने वापरुन मनुष्यबळाद्वारे सफाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नालेसफाईपूर्वीची व नंतरची छायाचित्रे घेतली जाणार आहेत.  डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, महापालिका

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories