पुण्यात सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेतच बांधकामे होणार, पुणे महापालिकेचा आदेश जारी

पुण्यात सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेतच बांधकामे होणार, पुणे महापालिकेचा आदेश जारी

पुण्यात सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेतच बांधकामे होणार, पुणे महापालिकेचा आदेश जारी

पुणे, ता. २६ - शहरात बहुसंख्य ठिकाणी शासनाकडून व खासगी बांधकामे सुरु आहेत. या बांधकामुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने  बांधकामाच्या वेळा निश्चित केल्या आहे. आता पुणे शहरात सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेतच बांधकाम करावे लागणार आहे. हा आदेश महापालिकेने बुधवारी (ता. २५) जारी केला आहे.

महापालिका प्रशासनाने सांगितले आहे की, शहरात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बांधकामांमुळे हवा गुणवत्ता निर्देशांक खालावत असून ध्वनी प्रदूषणातही वाढ होत आहे. सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या या कामांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. त्यामुळे, पर्यावरणाचे संरक्षण व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने  सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेतच बांधकामे करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिकांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे. 

बांधकाम वेळेतील बदलांचे आदेश जारी 

''पुणे शहरात सुरु असलेल्या बांधकामांमुळे ध्वनी व हवा प्रदूषणात वाढ होतेय. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो. आरोग्यावर परिणाम होतो. पर्यावरणाची हानी होते. म्हणून, महापालिका हद्दीतील सर्व प्रकारच्या बांधकाम प्रकल्पांची कामाची वेळ सकाळी ७ ते रात्री ९ केली आहे. याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ''

- अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, पुणे महापालिका

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories