news
clock
तळेगाव दाभाडे येथील  इंद्रायणी महाविद्यालयात शनिवारी 'नोकरी महोत्सव'

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात शनिवारी 'नोकरी महोत्सव'

तळेगाव दाभाडे येथील  इंद्रायणी महाविद्यालयात शनिवारी 'नोकरी महोत्सव'

पिंपरी, ता. २७ -  तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने शनिवारी (ता. २८) 'नोकरी महोत्सव' आयोजित केला आहे. यशोदा महादेव काकडे कॉलेज इंजिनिअरिंग व इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ९ वाजता खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते नोकरी महोत्सवाचे उद्घाटन होईल. सायंकाळी ५ पर्यंत महोत्सव सुरु असेल. 

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, युवा उद्योजक रणजित काकडे यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाची माहिती दिली. महोत्सवात पाचवी ते दहावी, बारावी, डिप्लोमा, आयटीआय, इंजीनियरिंग, बी.एस.सी., एम.एस.सी., बी.ए., बी.कॉम, बी.बी.ए., बी.सी.ए. उत्तीर्ण असलेल्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे. याचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महिलांना धरुन शिवणकाम करण्याचे काम महोत्सवातून मिळणार आहे. 

पात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेवरच नोकरी मिळावी, यासाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे, असे आयोजकांनी सांगितले. नोकरी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला  संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, माजी मंत्री बाळा भेगडे, 'डीएमसीएफएस'चे कार्यकारी संचालक डॉ. संजय झोपे, उद्योजक संजय साने, संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, तहसीलदार वैशाली होणार वाघमारे, आरएमके स्पेसेसचे संचालक युवा उद्योजक रणजित काकडे, उद्योजक विशाल लोखंडे, उद्योजक महेश निंबाळकर, आदी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories