वाकडमध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सीबीएसई शाळेचे 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय' असे नामकरण करावे
वाकडमध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सीबीएसई शाळेचे 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय' असे नामकरण करावे
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव स्वप्निल बनसोडे यांची मागणी, अधिकाऱ्यांने निवेदन
पिंपरी, ता. २७ - पिंपरी-चिंचवड महापालिका वाकड येथे सीबीएसई शाळा उभारत आहे. या शाळेला 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय' असे नाव द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव स्वप्निल बनसोडे यांनी केली आहे.
या संदर्भात बनसोडे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर रवी लांडगे तसेच स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, वाकड परिसरात उभारली जात असलेली ही शाळा भविष्यात हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याने, तिला प्रेरणादायी नाव देणे आवश्यक आहे.
वाकडसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या भागात पायाभूत सुविधांबरोबरच मूल्याधिष्ठित शिक्षणालाही तितकेच महत्त्व दिले जाणे गरजेचे आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणादायी विचारांची जोपासना होण्यासाठी शाळेला 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय' असे नाव देणे महत्त्वाचे आहे. याबाबत प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे, असे बनसोडे यांनी निवेदनात म्हटले आहे.