मोशीतील छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी केलेली सल्लागाराची नियुक्ती चुकीची - नगरसेविका सुलभा उबाळे

मोशीतील छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी केलेली सल्लागाराची नियुक्ती चुकीची - नगरसेविका सुलभा उबाळे

मोशीतील छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी केलेली सल्लागाराची नियुक्ती चुकीची - नगरसेविका सुलभा उबाळे 

पिंपरी, ता.‌ १० - मोशी येथीलछत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी मे. क्रिएशन्स इंजिनियर्स‌ प्रायव्हेट लिमिटेड यांची या कंपनीची सल्लागार म्हणून  करण्यात आलेली नियुक्ती ही चुकीची आणि भ्रष्टाचाराला वाव देणारी आहे. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होणार आहे. प्रशासनाने या निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची तातडीने सखोल चौकशी करावी अशी मागणी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.


उबाळे यांनी आयुक्तांना व मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात सांगितले आहे की, मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज‌ पुतळा प्रकल्पासाठी आत्तापर्यंत एकूण सुमारे ९२.७६ कोटी रूपयांच्या निविदा सदर प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या आहेत.

टप्पा-१ ते ३ च्या निविदांंनंतरच्या  कामांसाठी प्रकल्प सल्लागार म्हणून मे.क्रिएशन्स इंजिनिअर्स प्रा.लि. यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 टप्पा क्र.४ च्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाली असल्याची तक्रार मी यापुर्वी स्थायी समितीच्या बैठकीत व महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये वारंवार केलेली आहे.  मात्र मी उपस्थित केलेल्या मुद्यांची चौकशी अद्याप पर्यंत करण्यात आलेली नाही अथवा त्याबाबत मला कोणतेही उत्तर प्रशासनाकडून प्राप्त झालेले नाही.

 सदर प्रकल्पाच्या निविदांमध्ये रिंग झाली असून निकोप स्पर्धा झालेली नाही.  निविदांचे अंदाजपत्रक तयार करताना सदर कामासाठी तांत्रिक मान्यतेसाठी वापरण्यात आलेले रेट अँनालिसिस चुकीचे असल्याची शक्यता आहे.‌ विविध कामांचे/वस्तूंचे दर अवाजवी व फुगवून दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेचे सुमारे कोट्यावधी रूपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. विशेषतः बाजारभावापेक्षा अधिक दराने साहित्यांची गणना करून कंत्राटदाराला अवाजवी नफा मिळवून देण्यासाठी हे अंदाजपत्रक तयार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.


 निविदेमध्ये अनेक अशा वस्तू आणि कामांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांची प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आवश्यकता वाटत नाही. केवळ निविदेची रक्कम वाढविण्यासाठी अनावश्यक बाबी अंतर्भूत केल्याचे दिसून येते. विशिष्ट कंत्राटदारांना आर्थिक लाभ पोहोचवण्यासाठीच हा खटाटोप केला असल्याचे स्पष्ट होते. अशा फुगीर निविदांमुळे प्रकल्पाचा मुळ उद्देश बाजूला राहून केवळ भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे.‌

प्रकल्पाचे प्री व पोस्ट टेंडर कामांसाठी एकच सल्लागार असल्याने त्यांनी अंदाजपत्रक तयार करताना केलेल्या बेकायदेशीर व भ्रष्ट कारभार लपविण्यासाठीच सदर सल्लागाराची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे सदर प्रकल्पाच्या 'पोस्ट टेंडर' कामांसाठी त्याच सल्लांगाराची नेमणूक करणे चुकीचे व भ्रष्टाचाराला वाव देणारे आहे.  त्यामुळे मी उपस्थित केलेल्या वरील सर्व मुद्यांबाबत तातडीने चौकशी करण्यात यावी आणि मी दिलेल्या पत्राला प्रशासनाने उत्तर द्यावे, असे सुलभा  उबाळे‌ यांनी म्हटले आहे.

      



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories