सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन १५ ऑगस्टला - अध्यक्ष श्री. अजय पाताडे यांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन १५ ऑगस्टला - अध्यक्ष श्री. अजय पाताडे यांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन १५ ऑगस्टला

पिंपरी, ता.१४ ऑगस्ट २०२६: सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ, पिंपरी चिंचवड, पुणे यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ चे आयोजन शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे. प्राधिकरण, निगडी येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती भवन येथे दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.

या स्नेहसंमेलनात सिंधुदुर्ग भूषण पुरस्कार वितरण, जीवन गौरव पुरस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी मा. डॉ. राजेंद्र आत्माराम मुंबरेकर यांना सिंधुदुर्ग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. रवीभाऊ लांडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार शंकरराव जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरेखे, शहराध्यक्ष शंकर (बापू) काटे, माजी आमदार अंबादास जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप, चेअरमन अभिषेक बारणे, माजी नगरसेवक राजू मिसाळ, शिवसेना नेत्या सुलभाताई उबाळे आणि भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सुजाताताई पालांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्री. अजय संभाजी पाताडे यांच्या निमंत्रणाने आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनास मंडळाच्या सर्व सभासंस्था व सदस्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

संपर्क : 9170999333

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories