स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी

स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी

स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी 

पिंपरी, ता. १७ - महापालिकेच्या सोमवारी (ता. १७) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील नागरी सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर आदी उपस्थित होते. 

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, महापालिकेच्या शाळा, प्रशासकीय इमारती, विविध प्रभागांतील सीसीटीव्ही यंत्रणेची वार्षिक देखभाल-दुरुस्ती कामांसाठीच्या निविदांना आणि पाणीपुरवठा यंत्रणा, पंपहाऊस, ट्रान्सफॉर्मर व विद्युत यंत्रणांशी संबंधित विविध कामांसाठीचा खर्च, शाळा व दवाखान्यांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यासाठीच्या कामास मुदतवाढ दिली. 

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार फरक रकमेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी महापालिकेच्या वाट्याचा निधी देणे आदी विषयांना मंजुरी दिली.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories