news
clock
जिवंत काडतूसासह पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला सांगवीतून अटक

जिवंत काडतूसासह पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला सांगवीतून अटक

जिवंत काडतूसासह पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला सांगवीतून अटक 

पिंपरी, ता. ४ -  २७ वर्षीय तरुणाकडून  ५१ हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतूसासह पोलिसांनी सांगवी परिसरातून रविवारी (ता. ३) जप्त केले आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. 

पिस्तूल बाळगणारा तरुण अभिषेक अशोक भंडारी (वय २७ वर्षे) हा धनकवडी येथील रहिवासी आहे. त्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करुन पिस्तूल जिवंत काडतूसासह बेकायदेशीररित्या जवळ बाळगले. पोलिस हवालदार आशिष बनकर यांनी याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

त्याच्यावर रविवारी (ता. ३) सांगवी पोलिस ठाण्यात   भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories