भोसरीत तीन पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे जप्त, एकाला अटक

भोसरीत तीन पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे जप्त, एकाला अटक

भोसरीत तीन पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे जप्त, एकाला अटक

पिंपरी, ता. २६ : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने भोसरी परिसरात कारवाई करत एका सराईत आरोपीला अटक केली. त्याच्याकडून तीन देशी बनावटीची पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे, मोबाईल फोन व सॅक असा एकूण १ लाख ६६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शब्बीर उर्फ मलिक जहाँगीर शेख (वय ३८, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावजत्रा मैदानाजवळील ट्रॅव्हल्स पार्किंग, धावडे वस्ती (भोसरी) येथे आरोपी अवैधरित्या शस्त्रांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून तीन पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने लागू केलेल्या मनाई आदेशाच्या कालावधीत आरोपीने परवान्याशिवाय शस्त्रे बाळगून महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील आदेशाचे उल्लंघन केल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५, २५ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खाडे करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories