रेकॉर्डवरील दोन सराईत आरोपींकडून ३ पिस्तूल व २ काडतुसे जप्त, गुन्हे शाखा, युनिट-२ ची कामगिरी
रेकॉर्डवरील दोन सराईत आरोपींकडून ३ पिस्तूल व २ काडतुसे जप्त, गुन्हे शाखा, युनिट-२ ची कामगिरी
पिंपरी, ता. २६ - पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा, युनिट - २ च्या तपास पथकाने रेकॉर्ड वरील दोन सराईत आरोपींकडून ३ पिस्तूल व २ काडतुसे जप्त केली आहेत. आर्यन जाधव व ओमकार मोरे हे दोघे अटक आरोपी आहेत.
अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट-२ च्या तपास पथकाने शोधमोहिम राबवली. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणारे हे सराईत गुन्हेगार इसम हे चांदणी चौक, बावधन परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळाली होती.
त्यानुसार तपास पथकाने आरोपी १) आर्यन प्रकाश जाधव (वय २० वर्षे, रा. शिंदे यांचे खोलीत, श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट क्षत्रियनगर बावधन) आणि २) ओमकार सचिन मोरे (वय २३ वर्ष, रा. हमराज मित्र मंडळाजवळ शास्त्रीनगर कोथरुड) यांना २४ जूनला अटक केली. त्यांच्याकडून ३ पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरोधात बावधन पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट ३ (२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन १९५१ कलम 309(9)(3) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी ओमकार सचिन मोरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार त्याच्या विरुद्ध खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) चंदननगर पोस्टे गुरनं ०३/२०२५ बीएनएस ४८३.१११,६१ (बी), आर्म अॅक्ट ३(२५) व मपोकाक ३७(१) सह १३५
२) सिहगडरोड पोस्टे गुरनं २०२/२०२२ भादवि ३६३,३२५,३२४,३२३,१४३, १४४,१४७,१४९,५०४
३) कोथरुड पोस्टे गुरनं-११२/२०२५, आर्म अॅक्ट ३ (२५) व मपोकाक ३७(१) सह १३५
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे-१ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-२, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलिस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक दिपक खरात, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रविण दळे, नितीन ढोरजे, पोलिस हवालदार तुषार शेटे, विक्रम कुदळे, कुणाल शिंदे, मोहम्मद गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड, अली शेख, दिपक शिरसाट, कृष्णा शितोळे, पोशि/प्रशांत सैद, रवि पवार, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, धनंजय जाधव यांनी केली आहे.