पिंपरी-चिंचवड : भोसरीतील गावजत्रा मैदानात लोखंडी कोयता बाळगल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध असतानाही कोयता जवळ ठेवून आदेशाचा भंग केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब सोनबा आव्हाड (वय ३८, रा. धावडेवस्ती, भोसरी) या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याच्याकडे २०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता विनापरवाना आढळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मोहन पवार यांनी तक्रार दिली आहे.
आयुक्तालयाच्या परिसरात ११ ते २४ नोव्हेंबरदरम्यान घातक शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आला होता. मात्र, हा आदेश लागू झाल्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी गुलाब प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आलेल्या परिसरात कोयता घेऊन वावरताना आढळला.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात १५ नोव्हेंबरला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार काळे याचा तपास करीत आहेत.