सांगवीत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन ; तरुणासह अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

सांगवीत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन ; तरुणासह अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड : जुन्या सांगवीत धोकादायक शस्त्रे बाळगल्याच्या आरोपावरून एका तरुणासह अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून 15 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आयुक्तालयाच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शस्त्रे बाळगण्यावर प्रतिबंधक आदेश लागू आहे. हा आदेश लागू असताना दत्त आश्रम मठासमोरील मोकळ्या जागेत लोखंडी कोयता घेऊन एक तरुण आणि अल्पवयीन मुलगा आढळून आला. त्यांच्याकडे  500 रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता आढळळ्याचे तक्रारीत नमूद आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  11 ते 24 नोव्हेंबर दरम्यान लागू करण्यात आलल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून शस्त्र बाळगल्याचा आरोप संबंधितांवर आहे. आकाश अशोक शिंदे (वय 19) असे एका तरुणाचे नाव आहे, तर कायद्यातील तरतुदींनुसार अल्पवयीन मुलाची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

या प्रकरणी पोलीस शिपाई आकाश खंडागळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सांगवी पोलीस ठाण्यात 15 नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार या गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक काळभोर पुढील तपास करीत आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणावर हल्लाची किंवा कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories