पर्यटन विभागातर्फे कॅप्चर महा मान्सून फोटोग्राफी व रिल्स स्पर्धेचे आयोजन
पिंपरी, ता. ६ ऑगस्ट २०२६ - राज्याच्या पर्यटन विभागातर्फे 'Capture Maha Monsoon' फोटोग्राफी आणि रिल्स स्पर्धा आयोजित केली आहे. महाराष्ट्राच्या पावसाळी सौंदर्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याची सुवर्णसंधी आहे. यंदाच्या पावसाळ्यात धुक्याने नटलेले सह्याद्री, खळाळणारे धबधबे, हिरवाईने बहरलेली निसर्गरम्य दृश्ये, वैभवशाली वारसा, समृद्ध वन्यजीव, रंगतदार संस्कृती आणि भावविश्व समृद्ध करणारी आध्यात्मिक स्थळे आपल्या नजरेतून जगासमोर आणा, असे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे.
छायाचित्रकार, कंटेंट क्रिएटर, ट्रॅव्हलर, कलाकार किंवा नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. विजेत्यांना आकर्षक पारितोषिके जिंकता येणार आहेत तसेच महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अधिकृत माध्यमांवर झळकण्याची संधी मिळणार आहे. प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी QR कोड स्कॅन करायचा आहे.
स्पर्धेचे विषय आहेत.....
• निसर्ग
• वन्यजीव
• किल्ले, लेण्या, शिल्प अशी वारसास्थळे
• संस्कृती
• आध्यात्मिक पर्यटन
पारितोषिके.....
प्रथम पारितोषिक – ₹२५,०००
द्वितीय पारितोषिक – ₹१५,०००
तृतीय पारितोषिक – ₹१०,०००