चऱ्होलीत ८ हजारांचा गुटखा जप्त; एकाला अटक

चऱ्होलीत ८ हजारांचा गुटखा जप्त; एकाला अटक

चऱ्होलीत ८ हजारांचा गुटखा जप्त; एकाला अटक

पिंपरी, ता. २६ : आळंदी पोलिसांनी चऱ्होली खुर्द परिसरात कारवाई करून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा जप्त केला. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुटखा व दुचाकी असा एकूण २८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रामदास शंकरराव शिंदे (वय ३९, रा. तनिष सृष्टी, मरकळ रोड, चऱ्होली खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली खुर्द हद्दीतील वडगाव–आळंदी रस्त्यावर आरोपी दुचाकीवरून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली. आरोपीकडून ८ हजार ३६० रुपयांचा गुटखा आणि २० हजार रुपयांची होंडा शाईन दुचाकी असा एकूण २८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२३, २७१, २७२, २७४, २७५ आणि २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories