मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सारथी कार्यालयास भेट
पुणे, ता. २६ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मुख्यालयास भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. शासनाकडील सादर प्रस्तावांना मंजुरी दिली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला याप्रसंगी अभिवादन केले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सचिव शैला ए., विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर उपस्थित होते. व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांनी ‘सारथी’च्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
- महाराष्ट्र सरकार, Maharashtra Government, शैक्षणिक उपक्रम, Educational Initiatives, कौशल्य विकास, Skill Development
- , Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute, पुणे, Pune, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, Chief Minister Devendra Fadnavis, सारथी, SARTHI