'पॉश' कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी देणार - मंत्री आदिती तटकरे

'पॉश' कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी देणार - मंत्री आदिती तटकरे

'पॉश' कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी देणार - मंत्री आदिती तटकरे

पिंपरी, ता. २६ - राज्यातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि लैंगिक छळमुक्त कार्यस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी 'पॉश' (POSH - Prevention of Sexual Harassment)कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी देण्यात येणार असून, यासाठी महिला व बालविकास विभाग आणि कामगार विभागाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

कामगार, उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण, उद्योग तसेच संबंधित विभागांच्या सहभागातून पॉश कायद्याच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत अंतर्गत तक्रार समित्यांचे गठन व पुनर्गठन, ऑडिट प्रक्रियेत पॉश कायद्याच्या अंमलबजावणीचा समावेश, तसेच खासगी संस्थांच्या नोंदणी व नूतनीकरण प्रक्रियेत पॉश कायद्याअंतर्गत आवश्यक तरतुदींचा समावेश करण्याबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. मंत्रालयात आयोजित महिला व बालविकास व कामगार विभागाच्या संयुक्त आढावा बैठकीस दोन्ही विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories