कोयता बाळगणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १८ - मनाई आदेशाचा भंग करुन लोखंडी कोयता बाळगणाऱ्या २२ वर्षीय युवकाला बुधवारी (ता. १७) पोलिसांनी वाल्हेकरवाडी-चिंचवड येथून ताब्यात घेतले. या युवकाविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी संग्राम समीर येळवंडे (वय २२ वर्षे, रा. दत्तनगर, थेरगाव) याने लोखंडी कोयता जवळ बाळगला होता. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या क्षेत्रात ४ मार्च २०२६ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत शारीरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे अथवा बाळगणे बाबत मनाई आदेश असताना आरोपीने अवैधरित्या लोखंडी कोयता बाळगला होता, असे पोलिसांनी सांगितले.
चिंचवड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात आर्म अॅक्ट ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.