news
clock
पत्नीवर जीवघेणा चाकूहल्ला करणारा पती अटकेत

पत्नीवर जीवघेणा चाकूहल्ला करणारा पती अटकेत

पत्नीवर जीवघेणा चाकूहल्ला करणारा पती अटकेत

पिंपरी, ता. २२ - घरगुती भांडणात पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. यात पत्नी जखमी झाली आहे. ही घटना लक्ष्मी चौक-हिंजवडी येथे शनिवारी (ता. २१) सकाळी घडली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 

याबाबत, जखमी झालेल्या पत्नीने पतीविरोधात तक्रार नोंदवली आहे. फिर्यादी महिलेचा पती महेंद्र कांबळे हा शनिवारी (ता. २१) दारुच्या नशेत स्वतःच्या मुलाला शिवीगाळ करतच मारहाण करत होता. तेव्हा मुलाला वडीलांच्या तावडीतून वाचवण्यासाठी ही फिर्यादी आई मध्ये गेली असता त्याचा पतीला राग आला  आणि त्याने पत्नीवर चाकूहल्ला केला. 

 ''थांब आता तुला खल्लासच करतो'' असे म्हणत नशेतील पतीने घरातील लाकडी टेबलावर ठेवलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशाने पोटात भोकसले. यात पत्नी जखमी झाली. महेंद्र सोपान कांबळे (वय ३५, सिक्युरीटी गार्ड) असे पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९,११५ (२),३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories