राज्यातील रोजगारनिर्मितीसाठी सरकारचे मोठे पाऊल, मोठ्या आस्थापनांमध्ये एकूण २ लाख ५६ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय
राज्यातील रोजगारनिर्मितीसाठी सरकारचे मोठे पाऊल, मोठ्या आस्थापनांमध्ये एकूण २ लाख ५६ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय
पुणे, ता. २३ - राज्यात रोजगारनिर्मिती करण्यासाठी राज्य सरकारने विविध मोठ्या आस्थापनांमध्ये एकूण २ लाख ५६ हजार १३७ कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या विविध मोठ्या आस्थापनांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे भविष्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. राज्यातील १८ मोठ्या प्रकल्पांचा यात समावेश आहे. यामुळे सुमारे एक लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची १४ वी बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. या बैठकीमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित सोलर सेल, मॉडयुल, इग्नॉट, वेफर्स, ग्रीन स्टील, हरित अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अवकाश व संरक्षण साहित्य, लिथियम आयन बॅटरी, इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, साहित्य, स्टील व गॅस टू केमिकल निर्मितीच्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्यासाठीच्या १८ प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.
केल्या जाणाऱ्या गुतंवणूकींची तपशीलवार माहिती -
१) शिरुर, पुणे - जबिल सर्किट इंडिया प्रा. लि.
गुंतवणूक - १,५०० कोटी रुपये
रोजगार - ३,०००
२) तळेगाव, पुणे - युरोबस इंडिया प्रा. लि.
गुंतवणूक - ४,२०० कोटी रुपये
रोजगार - १२,०००
३) नाशिक - व्हच्र्युओसो कॉम्प्रेसर्स प्रा. लि.
गुंतवणूक - ८०० कोटी रुपये
रोजगार - ५००
४) छत्रपती संभाजीनगर - नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि.
गुंतवणूक - १,००० कोटी रुपये
रोजगार - १,०००
गोदावरी न्यू एनर्जी प्रा. लि.
गुंतवणूक - २७,५१५ कोटी रुपये
रोजगार - ४,०००
५) गडचिरोली - हरिओम पाईप इंडस्ट्रीज लि.
गुंतवणूक - ३,१३५ कोटी रुपये
रोजगार - ८,०००
रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री
गुंतवणूक - ४०,००० कोटी रुपये
रोजगार - २०,०००
६) रायगड - एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रॉडक्शन लि.
गुंतवणूक - ५६,८५२ कोटी रुपये
रोजगार - २५,०००
बालासोर अलॉयज
गुंतवणूक - १७,४७९ कोटी रुपये
रोजगार - ३,२००
७) अहिल्यानगर - निबे स्पेस
गुंतवणूक - ४,००० कोटी रुपये
रोजगार - १,०००
८) भंडारा जिल्हा - अशोक ले लँड लि.
गुंतवणूक - १०,००० कोटी रुपये
रोजगार - १,०००
९) बुटीबोरी, नागपूर - अकमे क्लीनटेक सोल्यूशन
गुंतवणूक - ११,४०० कोटी रुपये
रोजगार - ७,०००
१०) नागपूर - सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस
गुंतवणूकः १२,७८० कोटी रुपये
रोजगारः ६,८२५
११) अहिल्यानगर व धाराशिव - ग्लोब फोर्ज लिमिटेड
गुंतवणूक - १५,४३० कोटी रुपये
रोजगार - ३,६००
१२) रायगड / पालघर - अकमे क्लीनटेक - ग्रीन अमोनिया प्रकल्प
गुंतवणूक - ३७,८०० कोटी रुपये
रोजगार - ४,५००
अकमे क्लीनटेक - ग्रीन स्टील
गुंतवणूक -११,००० कोटी रुपये
रोजगार - २,५००
१३) चंद्रपूर - मिलियन स्टील प्रा. लि.
गुंतवणूक - २५६ कोटी रुपये
रोजगार -३६०
१४) अमरावती - टेंबो डिफेन्स प्रॉडक्ट प्रा. लि.
गुंतवणूकः १,००० कोटी रुपये