IIA पिंपरी चिंचवड सेंटरची नवीन कार्यकारिणी जाहीर ; ऋषिकेश देवरे अध्यक्ष तर उमेश नामदे उपाध्यक्ष

IIA पिंपरी चिंचवड सेंटरची नवीन कार्यकारिणी जाहीर ; ऋषिकेश देवरे अध्यक्ष तर उमेश नामदे उपाध्यक्ष

पिंपरी-चिंचवड | २९ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील वास्तुरचना क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (IIA), महाराष्ट्र चॅप्टरच्या पिंपरी-चिंचवड सेंटरची २०२६-२८ या कालावधीसाठी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. ‘संस्करण २०२६-२८’ या संकल्पनेच्या माध्यमातून शहराच्या विकासात वास्तुविशारदांचे योगदान अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे उपस्थित होते. त्यांनी नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन करत शहराच्या विकासात वास्तुविशारदांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

नव्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी आर्किटेक्ट ऋषिकेश देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘Together We Leave a Mark’ हे ध्येयवाक्य समोर ठेवून वास्तुविशारदांमध्ये समन्वय वाढवणे, ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि शहरांच्या शाश्वत विकासासाठी योगदान देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या कार्यकारिणीला मार्गदर्शन करण्यासाठी चार्टर्ड चेअरमन आर्किटेक्ट शशांक फडके, माजी अध्यक्ष आर्किटेक्ट गौतम सहा, आर्किटेक्ट संजीव भोसले, आर्किटेक्ट सचिन सुतार, आर्किटेक्ट डॉ. स्वप्निल शेठ आणि आर्किटेक्ट पारस नेत्रगांवकर यांचा सहभाग असणार आहे.

नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी आर्किटेक्ट उमेश नामदे आणि आर्किटेक्ट मधुरा बुटाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संयुक्त मानद सचिवपदी आर्किटेक्ट अंजिक्य निफाडकर आणि आर्किटेक्ट रक्षा पालांडे, तर खजिनदारपदी आर्किटेक्ट अनुराधा गोवर्धन आणि आर्किटेक्ट महेंद्र ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे.

कार्यकारिणी सदस्य म्हणून आर्किटेक्ट उदय कुलकर्णी, आर्किटेक्ट कृष्णा पाटील, आर्किटेक्ट चंद्रकांत पाटील, आर्किटेक्ट संदीप हिंगे, आर्किटेक्ट पूनम सोलंकी, आर्किटेक्ट दीपक चव्हाण, आर्किटेक्ट नरेंद्र जोशी आणि आर्किटेक्ट अवधूत जोशी यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

‘Learn, Connect, Contribute, Inspire’ या विचारांवर आधारित उपक्रमातून वास्तुविशारदांना एकत्र आणणे, व्यावसायिक सहकार्य वाढवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानासह नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शाश्वत शहरे, मजबूत व्यावसायिक संबंध, ज्ञान आणि नवकल्पना, सहकार्यपूर्ण प्रशासन आणि उज्ज्वल भविष्य या प्रमुख संकल्पनांवर कार्यकारिणीचा भर राहणार असल्याचे तसेच विद्यार्थ्यांना व नागरिकांना आपले शहर अजून सुंदर करण्यासाठी वेळोवेळी उपक्रम घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष ऋषिकेश देवरे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने विस्तार होत असताना नियोजनबद्ध विकास, दर्जेदार वास्तुरचना आणि पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींचे महत्त्व वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘संस्करण २०२६-२८’ उपक्रमाच्या माध्यमातून शहराच्या शाश्वत विकासाला चालना देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories