गिरिप्रेमीच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड
गिरिप्रेमीच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड
पिंपरी, ता. २६ - पुण्यातील अग्रगण्य गिर्यारोहण व साहसी क्रीडा संस्था गिरिप्रेमी संस्थेच्या अध्यक्षपदी उमेश झिरपे व कार्याध्यक्षपदी रुपेश खोपडे यांची निवड करण्यात आली. संस्थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच आपटे हॉल, पुणे येथे वातावरणात पार पडली. सभेमध्ये संस्थेच्या आगामी वाटचालीसंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले तसेच नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सभेमध्ये संस्थेचा वार्षिक अहवाल, सन २०२५-२६ चे लेखापरीक्षित आर्थिक अहवाल तसेच सन २०२६-२७साठीचा अंदाजपत्रक यांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यावेळी संस्थेने नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या तिसऱ्या एव्हरेस्ट मोहिमेसह वर्षभरातील विविध साहसी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध कामांसाठी स्वतंत्र कार्य समित्यांची स्थापना करण्यात आली असून सदस्यांचा सहभाग अधिक वाढवण्यावर भर देण्यात आला.
नवीन कार्यकारिणी अशी -
उमेश झिरपे (अध्यक्ष)
रुपेश खोपडे (कार्याध्यक्ष)
मनोज कुलकर्णी (सचिव)
अखिल काटकर (कोषाध्यक्ष)
उषःप्रभा पागे (कार्यकारिणी सदस्य)
भूषण हर्षे (कार्यकारिणी सदस्य)
आशिष माने (कार्यकारिणी सदस्य)
विवेक शिवदे (कार्यकारिणी सदस्य)