लाईटहाऊस प्रकल्पाचा दशकपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

लाईटहाऊस प्रकल्पाचा दशकपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

लाईटहाऊस प्रकल्पाचा दशकपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

पुणे, ता. २६ - पुणे महानगरपालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला “लाईटहाऊस – कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती प्रकल्प” यंदा यशस्वीपणे दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. पुणे शहरातील वस्ती पातळीवरील तरुण-तरुणींना कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या माध्यमातून सक्षम बनविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.

दिनांक २५ जून २०२६ रोजी लाईटहाऊस प्रकल्पाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दशकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास परशुराम वाडेकर (उपमहापौर, पुणे महानगरपालिका), ओमप्रकाश दिवटे (अतिरिक्त आयुक्त(वि), पुणे महानगरपालिका),  आशा राऊत (उपआयुक्त, समाज विकास विभाग), सनी निम्हण (नगरसेवक, पुणे महानगरपालिका), भक्ती गायकवाड (नगरसेविका, पुणे महानगरपालिका),  सपना छाजेड (नगरसेविका, पुणे महानगरपालिका), रामदास चव्हाण (मुख्य समाज विकास अधिकारी), रुची माथुर (सहसंस्थापक, लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन) तसेच  अमृता बहुलेकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन) आदी मान्यवर उपस्थित होते. 

“आजच्या स्पर्धात्मक युगात तरुणांनी शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींचा लाभ घेत स्वावलंबी होणे गरजेचे आहे. पुणे महानगरपालिकेच्या लाईटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता ओळखून स्वयंप्रकाशित होण्याची आणि आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याची प्रेरणा मिळत आहे. हा प्रकल्प युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे,” असे मत मा. उपमहापौर श्री.परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केले.

मान्यवरांच्या उपस्थितीत हा दशकपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा प्रकल्प युवकांच्या स्वप्नांना प्रत्यक्ष आकार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच, संस्थेच्या पुढील वाटचालीस आणि प्रशिक्षार्थींच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा देण्यात आल्या.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories