बैलगाडा शर्यतींनी तळेगाव दाभाडेमध्ये श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवात रंगत

बैलगाडा शर्यतींनी तळेगाव दाभाडेमध्ये श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवात रंगत

 बैलगाडा शर्यतींनी तळेगाव दाभाडेमध्ये श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवात रंगत

पिंपरी, ता. २१ - तळेगाव दाभाडेचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा वार्षिक उत्सव सुरु आहे. महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. उत्सवात बैलगाडा शर्यत मोठ्या जोशात पार पडल्या  आणि हेच उत्सवाचे मोठे आकर्षण ठरले. या बैलगाडा शर्यतीत गुरुवारी आणि शुक्रवारी  मावळ, हवेली, खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, मुळशी, पुरंदर आदी तालुक्यांतील व पिंपरी-चिंचवड उपनगरांतील एकूण ३०० बैलगाडे सहभागी झाले. 

उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय पाटोळे यांच्या हस्ते घाटाचे पूजन झाले. गावकीच्या बैलगाड्यातून विलास काळोखे (११.२१ सेकंद) यांच्या बैलगाड्याने प्रथम सोमाभाऊ भेगडे (११.४६ सेकंद) यांच्या बैलगाड्याने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ४ लाख २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक तसेच  चार टू-व्हीलर, दोन कुट्टी मशीन, दोन फ्रीज, दोन कूलर, चषक देऊन गौरविण्यात आले.

शर्यतीचा निकाल पुढीलप्रमाणे .....

बैलगाडा स्पर्धा : पहिला दिवस...

- प्रथम क्रमांक: दशरथ भगवान गराडे/गणेश दादा गराडे (१२.२२)

- द्वितीय क्रमांक : प्रसाद भगवान चौधरी / राजेंद्र शंकर भोंडवे (१२.३०)

- तृतीय क्रमांक : साईनाथ नंदकुमार कुटे/आबाजी होनाजी हिले (१२.३३)

- चतुर्थ क्रमांक: गणपत मारुती ठोंबरे/रोहिदास कुटे (१२.५१)

- पाचवा क्रमांक: प्रथमेश अण्णासाहेब पारखी/मल्हार शेठ मोरे (१२.५६)

बैलगाडा स्पर्धाः दुसरा दिवस

- प्रथम क्रमांक: ज्ञानेश्वर दहातोंडे/संजय निघोट (१२.१०) गोविंदाण्णा शंकर ढोरे/अमर गवळी (१२.१०)

- द्वितीय क्रमांक : नवनाथ चंद्रकांत सुतार/यश पप्पू दाभणे (१२.११)

- तृतीय क्रमांक: जालिंदर विठोबा बराटे/नामदेव बिरवडे (१२.१३)

- चतुर्थ क्रमांक : अद्वैत दादा मस्के/साहिल शेठ मोढवे (१२.१७)

- पाचवा क्रमांक : आदिराज लहू दादा कदम/बाळासाहेब राघोजी ठाकूर (१२.२३)

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories