हिंजवडी-बाणेर मेट्रो १५ जुलैपर्यंत धावणार

हिंजवडी-बाणेर मेट्रो १५ जुलैपर्यंत धावणार

हिंजवडी-बाणेर मेट्रो १५ जुलैपर्यंत धावणार

पुणे, ता. ११ - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीतील पायाभूत सुविधांचा विकास, वाहतूक कोंडी आणि पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता. १०) पत्रकारांशी संवाद साधताना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. 

 ‘पुणे मेट्रो लाईन ३’ अंतर्गत माण-हिंजवडी ते बाणेर दरम्यानचा पहिला टप्पा (१२ स्थानके) १५ जुलैपर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाईल. तसेच, ऑगस्टअखेरपर्यंत ही मेट्रो शिवाजीनगरपर्यंत पोहोचेल. या मार्गावरील मेट्रो सुरू होण्याची प्रत्यक्षात मुदत संपली आहे. सध्याच्या कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, माण डेपोपासून १२ स्थानके सुरू करण्याबाबत प्रस्ताव ठेवला होता. आगामी पावसाळा व इतर काही प्रलंबित कामांमुळे जून अखेरपर्यंत व तोपर्यंत शक्य न झाल्यास १५ जुलैपर्यंत कामे पूर्ण होऊ शकतील," असे चौधरी यांनी सांगितले."

इतर माहिती -

 - पीएमआरडीए हद्दीतील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ‘प्रादेशिक पाणीपुरवठा योजना’ (Regional Water Supply Scheme) आणि नदी सुधार प्रकल्प राबवला जाणार आहे.

- ‘एआय’ (AI) ड्रोन तंत्रज्ञान: विनापरवाना आणि अनधिकृत होर्डिंग्ज शोधण्यासाठी आता अत्याधुनिक ‘एआय’ आधारित ड्रोन सर्वे तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अनधिकृत होर्डिंगधारकांवर यापुढे कठोर कारवाई होणार आहे.

- वाहतूक कोंडीवर तोडगा: चाकणमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ते विकासाचे काम पीएमआरडीए स्वतः करणार. रिंगरोडच्या भूसंपादनाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेणार.

- डिजिटल आणि गतिमान प्रशासन: नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी ‘सिंगल विंडो इनवर्ड-आऊटवर्ड’ सुविधा सुरू. फाईल नेमकी कुठे थांबली आहे, हे आता एका क्लिकवर कळणार.

-मान्सूनपूर्व तयारी: हिंजवडी आयटी पार्क परिसरातील मुख्य नाले मोकळे करण्यात आले असून, हद्दीतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले आहे.

➕ इतर महत्त्वाचे निर्णय:

🏠 महानगर हद्दीतील प्रत्येक तालुक्यात किमान एक गृहप्रकल्प (घरकूल योजना) राबवणार.

🚒 नागरिकांच्या सुरक्षेसाठी १० नवीन अग्निशमन केंद्रे उभारणीचे काम प्रगतीपथावर.

🛣️ ग्रामीण रस्ते दुरुस्तीसाठी ‘पुणे ग्रँड टूर’ अंतर्गत पीएमआरडीए निधी देणार.

⚖️ पॉक्सो कोर्टाच्या इमारतीचे बांधकाम सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories