news
clock
जनगणनेतील स्व-गणनेचा पहिला टप्पा महाराष्ट्रात १ मेपासून सुरु, १६ मे पर्यंत नागरीकांना अधिकृत वेबसाइटवरुन स्व-गणना करता येणार

जनगणनेतील स्व-गणनेचा पहिला टप्पा महाराष्ट्रात १ मेपासून सुरु, १६ मे पर्यंत नागरीकांना अधिकृत वेबसाइटवरुन स्व-गणना करता येणार

 जनगणनेतील स्व-गणनेचा पहिला टप्पा महाराष्ट्रात १ मेपासून सुरु, १६ मे पर्यंत नागरीकांना अधिकृत वेबसाइटवरुन स्व-गणना करता येणार

पिंपरी, ता. २ - राष्ट्रीय जनगणनेच्या स्व-गणनेचा पहिला टप्पा महाराष्ट्रात १ मे २०२६ पासून सुरु झाला आहे.  १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना se.census.gov.in या अधिकृत वेबसाइटवरुन स्व-गणना करता येणार आहे. हा टप्पा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्य जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिली. 

 राज्यभरात या कामासाठी सुमारे २.६४ लाख क्षेत्रीय कर्मचारी, जनगणना अधिकारी आणि पर्यवेक्षक तैनात करण्यात आले असून, १० टक्के राखीव कर्मचारीही ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी स्व-गणना करून जनगणना प्रक्रियेला सहकार्य करावे, फक्त अधिकृत वेबसाइट se.census.gov.in वरूनच माहिती भरावी, कोणत्याही संशयास्पद लिंक, एसएमएस किंवा ई-मेलवरून माहिती भरणे टाळावे, जनगणनेसाठी कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सावधगिरी बाळगावी आणि  जनगणनेच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 


स्व-गणना कशी करावी ?

- अधिकृत संकेतस्थळ: se.census.gov.in

- एका कुटुंबासाठी फक्त एकच अर्ज भरावा येईल

- एकूण ३३ प्रश्नांची माहिती अचूकपणे भरावी लागेल.

- कोणतीही कागदपत्रे किंवा दस्तऐवज अपलोड करण्याची गरज नाही.

- माहिती पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला ११ अंकी युनिक आयडी मिळेल.

- हा युनिक आयडी नंतरच्या पडताळणीसाठी काळजीपूर्वक जतन करून ठेवावा.

- स्व-गणना न केलेल्या किंवा स्व-गणना केलेल्यांची पडताळणी करण्यासाठी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जनगणना अधिकारी घरोघरी भेट देऊन घरगणना   करतील. स्व-गणना केलेल्या नागरिकांना यावेळी आपला ११ अंकी युनिक आयडी दाखवावा लागेल.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories