देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी‘एमआयडीसी’कडून उद्या शहरात पाणीपुरवठा बंद
पिंपरी, ता. २९ जुलै २०२६ - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल व दुरुस्तीसाठी गुरुवारी (ता. ३०) शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा बंद असणार आहे, अशी माहिती माहिती एमआयडीसी प्रशासनाने दिली. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सी.एम.ई, आर ॲन्ड डी दिघी, व्ही.एस.एन.एल. कॅन्टोमेन्ट बोर्ड, ओ.एफ.डी.आर. या भागात गुरुवारी (ता. ३०) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. ३१) आणि शनिवारी (ता. १) पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा आणि पाणी काटकसरीने वापरा, असे प्रशासनाने सांगितले आहे.
- जलशुद्धीकरण केंद्र, Water Treatment Centre Maintenance, देखभाल दुरुस्ती कामे, Maintenance Work
- पिंपरी-चिंचवड पाणीपुरवठा, Maharashtra Industrial Development Corporation, MIDC, एमआयडीसी, MIDC Water Treatment Plant
- पाणीपुरवठा बंद, Water Supply Disruption, पाणी कपात, Water Cut
- एमआयडीसी पाणीपुरवठा बंद, MIDC Water Supply Shutdown