महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी 'आधार अपडेट कॅम्प'

महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी 'आधार अपडेट कॅम्प'

महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी 'आधार अपडेट कॅम्प' 

पिंपरी, ता. २६ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आधार अपडेट कॅम्प आयोजित करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या आधार कार्डावरील माहिती अद्ययावत करणे तसेच नवीन आधार नोंदणीची सुविधा शाळेतच उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आधार कार्ड काढण्याची सुविधा शाळेतच उपलब्ध झाल्याने पालकांना मुलांना घेऊन ई-सेवा केंद्रात जावे लागणार नाही. शाळेच्या वेळातच विद्यार्थ्यांचे नवीन आधार कार्ड तसेच आधार दुरुस्तीची प्रक्रिया पार पडत आहे. 

शिक्षणासोबतच आवश्यक शासकीय सेवाही विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचविण्याचा महापालिकेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त ठरला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories