सुरक्षा साधनांशिवाय कामगारांकडून नालेसफाईची कामे करुन घेतल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांना बजावली नोटिस

सुरक्षा साधनांशिवाय कामगारांकडून नालेसफाईची कामे करुन घेतल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांना बजावली नोटिस

सुरक्षा साधनांशिवाय कामगारांकडून नालेसफाईची कामे करुन घेतल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांना बजावली नोटिस  

पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सफाई कर्मचाऱ्यांकडून आवश्यक सुरक्षा साधनांशिवाय नाल्यांच्या साफसफाईची कामे करून घेतली जात आहे. याबाबत, अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे विधी सल्लागार अॅड. सागर चरण यांनी १० जून रोजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती. या अतिशय महत्त्वपूर्ण तक्रारीची दखल आयोगाने घेतली असून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना नुकतीच नोटिस बजावली आहे. 

नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत संबंधित प्रकरणातील वस्तुस्थिती व केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आयोगाने आयुक्तांना दिले आहेत. मुदतीत उत्तर प्राप्त न झाल्यास दिवाणी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करून संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिक किंवा प्रतिनिधीद्वारे आयोगासमोर हजर राहण्यास समन्स बजावण्यात येऊ शकते, असे नोटिशीमध्ये स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये नाल्यांच्या साफसफाईची कामे करताना यांत्रिक साधनांचा वापर करणे बंधनकारक असतानाही मानवी श्रमाचा वापर करण्यात येत आहे. मजूर अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करत आहेत.  हाताने मैला साफसफाई करणाऱ्यांच्या नियोजनास प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन अधिनियम, २०१३ तसेच नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ आणि इतर संबंधित कायद्यांचे उल्लंघन होत आहे, हे अॅड. सागर चरण यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले होते. 

याबाबत बोलताना, अॅड. सागर चरण म्हणाले, ''पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांच्या साफसफाईची कामे सुरू आहेत. या कामांसाठी यांत्रिक साधनांचा वापर करणे बंधनकारक असतानाही उपलब्ध यंत्रसामग्रीचा पुरेसा वापर न करता मानवी श्रमाचा वापर केला जात आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.''




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories