महापालिका शाळांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरु, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार

पिंपरी, ता. ९ -  महापालिका शिक्षण विभागामार्फत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सोमवार (ता. ८) पासून सुरू करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष नियोजन केले आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या आदेशानुसार बालभारतीकडून प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके ८ ते १२ जून या कालावधीत वितरित करण्यात येणार आहेत. यासाठी आकुर्डी येथील महापालिकेची वसंतदादा पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील शाळा तसेच पिंपरी वाघिरे महापालिका शाळा ही दोन वितरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. 

या केंद्रांमधून महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा, शासकीय शाळा, खाजगी अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. सोमवारी आकुर्डी, निगडी, चिंचवड, चिंचवड स्टेशन, भोसरी आणि लांडेवाडी परिसरातील शाळांना पाठ्यपुस्तके देण्यात आली आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories